कुपवाड – बदलापूर व कोल्हापूर मधील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर नागरिक तसेच राजकीय विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी मविआकडून सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेत आज राज्यभरात आंदोलन केले आहे. यावेळी कुपवाड शहरात महाविकास आघाडी व कुपवाडकरांच्या वतीने मुक मोर्चा काढणेत आला. यामध्ये मविआचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत शाळेतील मुलामुलींनीही सहभाग दाखवला होता. यावेळी आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसह शिंदे सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात माजी नगरसेवक शेडजी मोहिते, कुपवाड शहर काँग्रेस कमिटीचे अद्यक्ष सनी धोतरे, उपाध्यक्ष समीर मुजावर, शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख सुरेश साखळकर व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते, सागर खोत, तानाजी गडदे सामाजिक कार्यकर्ते नासिरहुसेन मुजावर, अमोल कदम, दिलीप धोतरे, पंकज धोतरे, सिकंदर मुल्ला, अरुण रुपनर, कृष्णा कोकरे आदी उपस्थित होते.