
हुपरी (जि. कोल्हापूर) : माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. दिपाली गणेश काटवटे (वय ३०, रा. गंगानगर, हुपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती गणेश काटवटे, सासरे विजय काटवटे आणि सासू उज्वला काटवटे (सर्व रा. कराड, जि. सातारा) यांनी संगनमत करून तिचा छळ केला.
लग्नात मानपान कमी केल्याच्या कारणावरून तसेच दोन लाख रुपये माहेरून आणावेत, अन्यथा नांदवणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस करीत आहेत.