तासगाव बेळंकी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, समित दादा कदम यांच्या हस्ते प्रवेश

Share News

सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची तुफान घोडदौड सुरू असून सांगली जिल्ह्यात जोरात पक्ष बांधणी सुरू आहे. आज तासगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सनी गायकवाड ढवळीचे उपसरपंच वैभव पाटील विष्णू वाघमारे तसेच बेळंकी येथील विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश मेटकरी श्रीमंता वाघमारे , ग्रामपंचायत सदस्य सुनिता जाधव आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक कोरवी मातंग समाज अध्यक्ष अजय सदामते नेताजी आवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या हस्ते प्रवेश करून त्यांना पक्षांमध्ये मानसन्मान तसेच पुढील आगामी निवडणुकीमध्ये योग्य तो न्याय दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी महादेव कुरणे सांगली शहर जिल्हाध्यक्ष, पंकज म्हेत्रे मिरज शहर अध्यक्ष, योगेश दरवंदर उपाध्यक्ष, ओमकार नाईक तालुकाध्यक्ष, सुनील बंडगर, नाना घोरपडे, अमर पाटील, बंडू रुईकर, अनिल देवकते, प्रवीण झेंडे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!