
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 ला मंजुरी देण्यात आली. यामुळे येत्या ५ वर्षांत 1.25 लाख उद्योजक घडवणे आणि 50 हजार स्टार्टअप्स सुरू करणे हे उद्दिष्ट आहे.
🔹 मुख्यमंत्र्यांचा महा-फंड – 500 कोटींची तरतूद
🔹 25 हजार नवउद्योजकांना इन्क्युबेशन, मार्गदर्शन, आर्थिक मदत
🔹 स्टार्टअपसाठी प्रभावी इकोसिस्टम तयार होणार
🔹 महाराष्ट्रात देशातील 18% स्टार्टअप
इतर महत्वाचे निर्णय:
✅ वाढवण बंदर – समृद्धी महामार्ग फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी
✅ लहान/अकार्यक्षम भूखंड वाटप धोरणास मान्यता
✅ एसटी महामंडळाच्या जमिनींचा व्यावसायिक वापर
✅ नागपूर विणकर सुतगिरणी कामगारांना 50 कोटींचे अनुदान
✅ कुष्ठरुग्णांच्या संस्थांना अनुदान 2,000 वरून 6,000
📌 महाराष्ट्र स्टार्टअपसाठी अजून सक्षम बनणार!