
वॉशिंग्टन/नवी दिल्ली | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीएनबीसी या बिझनेस चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जाहीर केले की, भारतावर २५% अतिरिक्त कर लादण्यात येणार असून, पुढील २४ तासांत हा कर आणखी वाढवला जाईल.
ट्रम्प म्हणाले की, भारत हा अमेरिकेसाठी चांगला व्यावसायिक भागीदार नाही. तो जास्त निर्यात करतो, पण समान परतावा देत नाही. त्यांनी भारतातील कररचना जगातील सर्वाधिक असल्याचेही नमूद केले.
तसेच, भारत रशियासोबत व्यापार करून अप्रत्यक्षपणे युक्रेनविरुद्ध युद्धयंत्रणेला मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे कठोर आर्थिक पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, भारत सरकारनेही ट्रम्प यांच्या आरोपांना उत्तर दिले. अमेरिकाही रशियाकडून युरेनियम, पॅलेडियम, खते आणि रसायने मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे. अशा वेळी भारतावर एकतर्फी बोट ठेवणे अन्यायकारक आहे, असे भारताने स्पष्ट केले.
ट्रम्प यांच्या विधानामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.