
सांगनी सुनेगाव : उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लिमीटेड या प्रतिष्ठित डेअरीला गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी अहमदपूरचे माजी सहकार राज्यमंत्री मा. बाळासाहेब जाधव व श्री. अविनाश जाधव यांनी त्यांचा औपचारिक सत्कार केला.
श्री. मुश्रीफ यांनी डेअरीच्या विविध यंत्रणा, दूध संकलन प्रक्रिया आणि दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. डेअरीचे मॅनेजर संदीप पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांशी असलेली नाळ व गुणवत्तेवरील भर याची माहिती दिली.
उजना डेअरीचे चेअरमन बाबासाहेब पाटील असून संचालक म्हणून अविनाश जाधव व सुरज पाटील योगदान देत आहेत.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू), शशिकांत पाटील चुयेकर, प्रा. किसन चौगले, बिद्री साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मनोजभाऊ फराकटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, मयुर आवळेकर, निलेश शिंदे, गोकुळ डेअरीचे जी.एम. अनिल चौधरी, वरिष्ठ दूध संकलन अधिकारी सर्जेराव पाटील (माणकर) आणि मार्केटिंग अधिकारी शिवाजी चौगले आदी मान्यवर उपस्थित होते.