
बानगे : लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना लि. च्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऊस शेती तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळावा बानगे येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या संचालिका सौ. प्रतिभा पाटील होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांनी शेतकऱ्यांना ऊस शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सदा-साखरचे व्हा. चेअरमन मा. आनंदराव फराकटे, ज्येष्ठ संचालक मा. विश्वास कुराडे, मा. तुकाराम ढोले, मा. विष्णु बुवा, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. बी.जी. पाटील, माजी सरपंच तुकाराम सावंत, बानगेचे सरपंच सुनील बोगाडे, माजी सरपंच युवराज पाटील, जिल्हा कृषी उद्योग संघाचे संचालक बाळासाहेब चौगुले, सुभाष भांडवले, बाबुराव हिरुगडे (गुरुजी), अनिल सिद्धेश्वर, सर्जेराव आवघडे, बाजीराव मेथे, अशोक पाटील, निवास पाटील, सर्जेराव पाटील, रामचंद्र कोंडेकर, पांडू ताटे, व पत्रकार रमेश पाटील (सोनगे) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी बाळासाहेब देसाई (से. कापशी), प्रताप उर्फ पप्पू पाटील, विठ्ठल सुपले, अमर पाटील, विजय चव्हाण यांचा “आदर्श शेतकरी” म्हणून मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत ऊस विकास अधिकारी सुशांत जाधव यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. भगवान पाटील यांनी केले. सुत्रसंचालन संजय जिरगे यांनी तर आभारप्रदर्शन एम.आर. आंबी यांनी केले.
या कार्यक्रमात शेती अधिकारी प्रताप मोरबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील, डी.ए. परीट, आनंदा लोखंडे, डी.एस. दारवाडकर, अनिल राऊत यांच्यासह शेती मदतनीस प्रवीण काटे, रावसाहेब अस्वले, काकासो नरके, श्रीधर पाटील, धनाजी एकल, सुभाष पाटील, आनंदा भारमल, रमेश शिंदे, नितीन मोरबाळे, विष्णु फास्के, गणेश कांबळे, विकास पाटील, नागेश गिरी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.