
हुपरी (ता. हातकणंगले) : वडापाव गाडीच्या जुन्या वादातून चौघा जणांनी एक तरुणास मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी जवाहर चौपाटी समोर घडली. याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन गजानन कदम (वय 31, व्यवसाय – धंदा, रा. इंगळी, ता. हातकणगले) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भावाचा शिवनेरी हॉटेल आहे, तर आरोपींचा स्टार वडापाव चा गाडा आहे. पूर्वी व्यवसायिक वादातून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी विश्वजीत संताजी पाटील, सतांजी पांडुरंग पाटील, महेश पांडुरंग पाटील आणि पृथ्वीराज धनाजी पाटील (सर्व रा. हुपरी) यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांनी प्लॅस्टीकची खुर्चीही फिर्यादीवर फेकून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.