
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना व अंगणवाडी सेविकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व इतरांनाही त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा. यासाठी मा. हसन मुश्रीफ फौंडेशन, कागलच्या वतीने शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसनसो मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुरस्कार देण्यात येतात. . याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा के. डी. सी.सी. बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष युवराज बापू पाटील,शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ, को.जि.मा.शि. चे संचालक राजेंद्र पाटील, चेअरमन के आर पाटील,माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन जी.एस. पाटील, निमंत्रित सदस्य जि. प. सुकुमार पाटील, को.जि.मा.शि. पतपेढीचे मा. चेअरमन किरण पास्ते, बहुजन माध्य पतपेढी संचालक नंदकुमार कांबळे, को.जि.मा.शि. पतपेढी संचालक शानाजी माने, उमेश माळी, संजय कदम, के व्ही पाटील, नंदकुमार घोरपडे, तानाजी सामंत, काकासो पाटील, पी.बी.भारमल, रघुनाथ जाधव, सुनील वावरे,सुरज भुरले, सुरज कांबळे,सुभाष भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारा साठी अर्ज हसन मुश्रीफ फाउंडेशन कागल, मुरगूड तसेच गडहिंग्लज मध्ये द्यावेत असे आवाहन करणेत आले आहे.