
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, शिवमंदिर परिसर, काका, दत्तनगर आणि मगरमच्छ कॉलनी १ ते ५ मधील नागरिकांनी पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे. पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीची पातळी वाढत असून, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी २४x७ वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी स्थलांतर करताना आवश्यक साहित्य सोबत घ्यावे आणि मनपाने निश्चित केलेल्या निवारा केंद्रात सुरक्षित स्थलांतरित व्हावे. आपत्कालीन मदतीसाठी 70 660 40 330, 331, 332 हे संपर्क क्रमांक तसेच संबंधित प्रभाग समिती सदस्य व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपलब्ध असणार आहेत.