
कोल्हापूर ता. 30 :- राजारामपूरी परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर काही मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडली होती. याबाबत महापालिकेकडे भटकी जनावरे व पाळीव जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असलेबाबतची तक्रार आली होती. त्याप्रमाणे महापालिकेने भटकी जनावरे पकडण्याची मोहिम हाती घेतली. यावेळी खाजगी जनावरांच्या मालकांना त्यांची जनावरे रस्त्यावर न सोडणे बाबत सक्त सूचना दिल्या होत्या. परंतु वेळोवेळी सूचना देऊनही राजारामपूरी शाहू मिल परिसरातील हेमंत कवाळे व शुभम कवाळे यांनी त्यांची खाजगी जनावरे रस्त्यावर सोडलेने त्यांना प्रत्येकी रुपये 1000/- प्रमाणे रु.2000/- चा दंड करण्यात आला आहे. सदरची कारवाई पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, आरोग्य निरिक्षक स्वप्निल उलपे, महेश भोसले, शर्वरी कांबळे व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.