
बस्तवडे (ता. कागल) येथील सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य सातापा पुंडलिक कांबळे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या एका शानदार कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे , सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरससाट नाम. संजय राठोड,ना. भरत गोगावले व सामाजिक न्याय विभाग प्रबंधक सचिव हर्षदीप कांबळे साहेब यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे प्रधान करण्यात आला.
श्री. साताप्पा कांबळे यांनी यापूर्वी बस्तवडे गावचे सरपंच पद भूषवले असून ते कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य आहेत. तसेच परिसरातील सामाजिक व विधायक कामामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. कागल तालुक्यामध्ये शासनाच्या विविध योजना, विविध सामाजिक प्रबोधन कार्यक्रम, गरजू व हुशार मुलांना शिक्षणासाठी मदत, लोकांना आरोग्याच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम , तळागाळातील व उपेक्षित लोकांना त्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यासाठी शासनाच्या विविध माध्यमातून काही पाणी सहकार्य ते करत असतात. कोरोनाच्या काळात त्यांचे कार्य कौतुकास्पद होते. विविध संघटनाच्या माध्यमातून सतत लोकांच्या संपर्कात राहत असतात. गेल्या चार-पाच वर्षात तरी संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्याच्या माध्यमातून गरजू व पात्र लोकांना संजय गांधी व श्रावणबाळ योजना लोकांच्या पर्यंत प्रभावीपणे काम करून हजारो लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यासाठी अत्यंत दिवस रात्र काम करून लोकांना लाभ दिला आहे. विविध समाज व्याख्यान, आरोग्य शिबिरे , लोकांना कृषी अवजारे, शालेय विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागांमधून सायकली , लॅपटॉप , झेरॉक्स मशीन , शिवण यंत्र , विधवा व दारिद्र रेषेखालील महिलांना पशुसंवर्धन च्या योजना , रमाई आवास व व घरकुल योजना इत्यादींचा लाभ मोठ्या प्रमाणात दिला आहे. विविध सामाजिक प्रबोधन कार्यक्रम ,अंधश्रद्धा , शेतकरी मेळावे ,व शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतले आहेत. सर्वच महापुरुषांच्या विचाराने ते कार्यरत असतात. कोल्हापूर जिल्ह्याचे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या गटाचे ते जिल्ह्याचे माजी. खासदार संजय दादा मंडलिक व युवा नेते ॲड वीरेंद्रसिंह मंडलिक भैया यांचे ते जवळचे व विश्वासू कार्यकर्ते आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर यांनी स्वतः निवासस्थानी बोलावून मंडलिक कुटुंब यांच्या वतीने यथोचित सत्कार केला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आद. राजरत्न आंबेडकर यांनी सुद्धा त्यांच्या मुंबई निवासस्थानी शाल,बुके,व पेढे भरून सत्कार केला. त्यांना या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. याबद्दल कागल तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातून व सीमा भागातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.