
कागल : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी कागल शहरात पोलीस दलाकडून रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च कागल पोलीस ठाणे येथून सुरू होऊन गैबी चौक, मरकज मशिद, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, निपाणी वेस, मातंग वसाहत, सांगाव नाका, ठाकरे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसटी स्टँड कागल, खर्डेकर चौक असा मार्ग पार करीत पुन्हा कागल पोलीस ठाणे येथे संपन्न झाला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळा व निपाणी वेस येथे दंगल काबू योजनेचा सरावही घेण्यात आला.
या रूट मार्चमध्ये १ अधिकारी, १० पोलीस अंमलदार, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील १ अधिकारी व ३ कर्मचारी तसेच पोलीस मुख्यालयातील आरसीपीचे १ अधिकारी व २७ कर्मचारी सहभागी झाले होते.