शहरात आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठा, सी व डी वॉर्डला दैनंदिन पाणी

Share News

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेने तात्पुरता उपाय म्हणून ए, बी व ई वॉर्डसह संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागात एक दिवस आड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. मात्र, सी व डी वॉर्डला दैनंदिन पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

ए व बी वॉर्डात गुरुवार, 28 ऑगस्टपासून एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे. यात पुईखडी परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी परिसर, आपटेनगर, कणेरकरनगर, नानापाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर, राजीव गांधी नगर, आयटीआय परिसर, रायगड कॉलनी, बालाजी पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, विजयनगर, शेंडापार्क आदी परिसरांचा समावेश आहे.

ई वॉर्डात शुक्रवार, 29 ऑगस्टपासून एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. यात राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, दौलतनगर, शाहूपूरी, राजेंद्रनगर, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, लोणार वसाहत, महाडीक वसाहत आदी भागांचा समावेश आहे.

नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

महापालिकेमार्फत टँकर सुविधा
ज्या भागात नळाद्वारे पुरेसा पुरवठा होणार नाही, त्या ठिकाणी महापालिकेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी कळंबा फिल्टर हाऊस संपर्क – गणेश लोंखडे (मो. 9766360506) आणि बावडा फिल्टर हाऊस संपर्क – संभाजी पाटील (मो. 9860448844) यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!