
हुपरी : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हुपरी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १२ रेकॉर्डवरील आरोपींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. माननीय अपर तहसीलदार सो. इचलकरंजी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे हा आदेश निर्गमित केला आहे.
या यादीत शुभम उमेश घोरपडे (चिटणीस चौक, हुपरी), प्रसाद सर्जेराव निंबाळकर (कागलवेस, हुपरी), केतन महावीर ठगरे (हुपरी), मोहिन मैनुद्दीन मुजावर (संभाजीनगर झोपडपट्टी, हुपरी), साईराज सुनिल गजरे (आण्णाभाऊ साठेनगर, हुपरी), शाहरुख मैनुद्दीन मुजावर (हुपरी), विक्रम मनोहर काटकर (शिवाजी नगर, हुपरी), शोएब रियाज मुल्ला (संभाजी मानेनगर, हुपरी), अमोल नवला केरु (पाटणकोडोली), विठ्ठल धळा रामान्ना (पाटणकोडोली), वैभव सुनिल चपरे (पाटणकोडोली) आणि प्रल्हाद बळवंत कांबळे (हुपरी) यांचा समावेश आहे.
सदर आरोपींना आदेशानुसार ठरावीक काळासाठी हुपरी पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.