
मिरज : गणेशोत्सव व ईद-ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील १७ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना मिरज शहर व तालुका कार्यक्षेत्राच्या हद्दीत प्रवेश व वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी ही कारवाई केली. या आरोपींविरुद्ध यापूर्वी शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध तसेच मागील गणेशोत्सवात झालेल्या गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली होती. त्यामुळे सणांच्या काळात त्यांचे वास्तव्य धोकादायक ठरू शकते, या कारणावरून उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी, मिरज यांनी त्यांच्यावर बंदी आदेश जारी केला आहे.
१) रणजीत ऊर्फ शरद केरबा ढोचळे (३१) रा. पाण्याचे टाकीजवळ, खंडेराजुरी, ता. मिरज
२) अनुल पोपट वायदंडे (२८) रा. पाण्याचे टाकीजवळ, खंडेराजुरी, ता. मिरज
३) सुहास सुनिल वायदंडे (२१) रा. पाण्याचे टाकीजवळ, खंडेराजुरी, ता. मिरज
४) आकाश अशोक कांबळे (२८) रा. पाण्याचे टाकीजवळ, खंडेराजुरी, ता. मिरज
५) विशाल मारुती शिंदे (२८) रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली
६) उत्तम अशोक नरुटे (२८) रा. सोनी, ता. मिरज, जि. सांगली
७) किरण उमाजी मलमे (३१) रा. एरंडोली, ता. मिरज
८) अजित अशोक शेजुळ (३२) रा. लक्ष्मीनगर, मालगाव, ता. मिरज
९) संकेत प्रल्हाद कांबळे (२९) रा. खंडेराजुरी, ता. मिरज
१०) अनिकेत प्रल्हाद कांबळे (२६) रा. खंडेराजुरी, ता. मिरज
११) प्रविण अनिल मगदुम (२६) रा. लक्ष्मीनगर, मालगाव, ता. मिरज
१२) अक्षय बबन पाटील (२५) रा. शिंदेवाडी, ता. मिरज
१३) विनायक परशुराम मगदुम (३५) रा. लक्ष्मीनगर, मालगाव, ता. मिरज
१४) राहुल अनिल मगदूम (२९) रा. लक्ष्मीनगर, मालगाव, ता. मिरज
१५) आप्पु ऊर्फ दत्तात्रय महादेव नाईक (३१) रा. आरग, ता. मिरज
१६) वाद्यासाहेब केरबा कोडलकर (३५) रा. लक्ष्मीनगर, मालगाव, ता. मिरज
१७) सुशांत सुरेश पाटील (३५) रा. सिध्देवाडी, ता. मिरज
या १७ गुन्हेगारांना ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ पासून ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत मिरज शहर व तालुका हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलिसांनी केली.