गणेशोत्सव व ईद ए मिलाद काळात मिरज पोलिसांची धडक कारवाई, १० रेकॉर्डवरील गुन्हेगारांना नो एंट्री

Share News

मिरज : शहरात गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, यासाठी मिरज शहर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. मिरज शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील दहा कुख्यात गुन्हेगारांना सांगली-मिरज-कुपवाड महापालिका हद्दीत ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून ते ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

नो एंट्री करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
१) ओम उर्फ ओमकार सुरज पाटील (रा. इंदिरानगर, मिरज)
२) आकाश उर्फ अक्षय जगन्नाथ फोंडे (रा. म्हाडा कॉलनी, रमा उद्यानजवळ, मिरज)
३) किरण विलास साठे (रा. माळी गल्ली, नदीवेस, मिरज)
४) जैद इरशाद रोहिले (रा. तांदुळ मार्केट, रेवणी गल्ली, मिरज)
५) मोहसीन खुदबुददीन शिकलगार (रा. सतारमेकर गल्ली, मिरज)
६) ध्रुव राहुल भोरे (रा. कमानवेस, मिरज)
७) असिफ शकील मुल्ला (रा. माळी गल्ली, मिरासो दर्गाहजवळ, मिरज)
८) विश्वेश धोंडीराम घोडके (रा. जवाहर चौक, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, मिरज)
९) रियाज मेहबुब सारवान (रा. मंगल टॉकीजसमोर, चप्पल मार्केट चौक, मिरज)
१०) सागर मारुती गडकरी (रा. गडकरी मळा, सुषाषनगर, मिरज)

या सर्व गुन्हेगारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांच्या हालचालींमुळे सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!