
हातकणंगले : तालुक्यातील यळगुड येथे हुपरी पोलिसांनी धडक कारवाई करत विदेशी दारूसह एकाला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजनेच्या सुमारास बागल माळावर छापा टाकला असता, संशयित आरोपी अरुण विलास कोणे ( वय ४८, रा. बारवाड, ता. निपाणी, जि. बेळगाव) हा काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवर (क्र. KA-23 ER-6376) विदेशी दारू घेऊन जाताना आढळला. त्याच्याकडून एकूण ९४ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या तसेच दुचाकीचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस करत आहेत.