
म्हाकवे: आणूर (ता. कागल) येथील विशाल रावसाहेब कोळी यांचे म्हाकवे- बानगे रस्त्यावर चौकात असणारे चिंतामणी ऑटो गॅरेज सोमवारी (दि.१५) रात्री बाराच्या सुमारास अज्ञाताने पेटवले. यात सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले.याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. सोमवारी दहा वाजता विशाल कोळी दुचाकी रिपेअरीचे काम पूर्ण झाल्यावर दुकान बंद करून घरी गेले. अज्ञात व्यक्तीने रात्री बाराच्या सुमारास सदर दुकानास आग लावली यामध्ये सर्व साहित्य व दुरुस्तीस आलेल्या दुचाकी जळून खाक झाल्या.