
कागल : कागल येथील आंबेडकर नगर परिसरात मध्यरात्री दोन मजली गारमेंट शॉपला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेदोनच्या सुमारास घडली. सुरज विक्रम कामत यांच्या मालकीच्या या गारमेंट शॉपमध्ये बर्मुडा आणि ट्रॅक सूटचे उत्पादन व साठवणूक केली जात होती.
आगीत दुकानातील रेडिमेड कपडे, कच्चा माल, कापड तसेच मशिनरी जळून खाक झाली असून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्राथमिक तपासात आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले असून कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. घटनास्थळी पंचनामा करून जळीत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.
