
पाच डायलेसीस युनिटद्वारे रुग्णांना मिळणार मोफत सेवा
कागल : कागल ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या डायलेसीस सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना दिलासा मिळणार असून ही सेवा जीवनदायी ठरणार आहे, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागल ग्रामीण रुग्णालयात पाच युनिटचे डायलेसीस सेंटरचा लोकार्पण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, कागलसारख्या ग्रामीण भागात डायलेसीसची सुविधा असावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मात्र निधीअभावी अडथळे येत होते. सार्वजनिक आरोग्य विभागाने पीपीपी तत्त्वावर ही योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याने आज हा उपक्रम सुरू करणे शक्य झाले. डायलेसीस युनिटमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा करण्यासाठी सुसज्ज हॉल बांधून देण्याची व्यवस्था केली जाईल, असे जाहीर जाहीर करून कागलच्या रुग्णांना कोल्हापुरात आणि कोल्हापूरच्या रुग्णांना पुणे -मुंबईला जावे लागणार नाही . अशी व्यवस्था उभी करणे आपले उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

एचएलएल कंपनीचे उपव्यवस्थापक अरुण गंगाधरन यांनी कंपनीच्या डायलेसीस सुविधेबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी डायलेसीस सुविधा सुरू करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले सहाय्यक अधीक्षक राम सातवेकर यांचा तसेच अवयवदानाचा संकल्प केलेबद्दल उत्तम कांबळे यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
स्वागत व प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरिता थोरात यांनी केले. सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले. डॉक्टर डी. पी. पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नवल बोते, डेप्युटी जनरल मॅनेजर अरुण गंगाधरण, इंडो काउंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतीश बुतडा, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, नेताजी मोरे, कर्नल विलास सुळकुडे, विवेक लोटे, संजय ठाणेकर, सतीश पोवार, सागर गुरव, युवराज लोहार, सुनील कदम, डॉ. जगदीश होनमाने, डॉ प्रशांत जाधव यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
