
कोल्हापूर : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील विठ्ठल बिरदेव मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. गंगाताई रामचंद्र भोजे (वय 49, रा. कोंढवे धावडे, पुणे) यांनी याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास मंदिरात दर्शनास गेलेल्या भोजे यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी-मंगळसूत्र (वजन 10 ग्रॅम, किंमत सुमारे 1 लाख रुपये) अज्ञात चोरट्याने लंपास केले. हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत.