
कागल : अन्नसुरक्षा मानदंडांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर गुटखा, सुगंधी तंबाखू व पानमसाल्याचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. जय हनुमान बेकरीमध्ये पाहणीदरम्यान पोलिसांना विविध ब्रँडचे गुटखा पानमसाल्याची एकूण 8 हजार 815 रुपये इतका मुद्देमाल मिळून आला. संशयित आरोपी संतोष हिंदुराव बारड (वय 45, रा. कागल) याच्याकडून सुगंधी सुपारी, जर्दा, विमल, आर.एन., मुसाफिर यांसह बंदी असलेले अनेक पदार्थ जप्त करण्यात आले.
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ हे मानवाच्या आरोग्यास घातक असून कर्करोगासारख्या आजारांना कारणीभूत ठरतात, तसेच महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रतिबंधित अन्नपदार्थ घोषित केले असतानाही आरोपी विक्री करत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस करीत आहेत.