
कागल : कोल्हापूर बेळगाव महामार्गावर एसटी स्टँडजवळ आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. अशोक लेलँड ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने समोरून जाणाऱ्या चारचाकी, दुचाकी आणि दोन बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडी चालक रशीद गजबर शेख व कृष्णात गुंडू चव्हाण (दोघे रा. करनूर, ता. कागल) जखमी झाले असून रशीद शेख यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दोन बैलांनाही इजा झाली आहे.
या घटनेप्रकरणी शमशुद्दीन बाबू ढोले (वय ६२, रा. कणेरकर नगर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली असून आयुब इस्माईल मुजावर (रा. चिक्कोडी, जि. बेळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस करत आहे.