डॉ बी. आर. आंबेडकर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक शेअर्स संदर्भात राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न

Share News

मुंबई : भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली डॉ.बी.आर.आंबेडकर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक शेअर्स संदर्भात महत्वाची बैठक काल शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मुंबई कल्याण येथे वालधुनी बुद्ध विहार मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित सर्व महाराष्ट्र मधुन आलेल्या पदाधिकारी यांना डॉ. राजरत्न आंबेडकर साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी मिटिंग साठी कोल्हापूर जिल्ह्यातून आपले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आयु.महेश धम्मरक्षित सर , महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आयु.दिलीप कांबळे सर , आपणास कायम सहकार्य करणारे आयु.संदिप कांबळे मुंबईकर , जेष्ठ मार्गदर्शक आयु. आर.बी.कोसंबी साहेब , विहार समन्वयक आयु.आर.आर.प्रधान , संघटक आयु. अशोक कांबळे , उपाध्यक्ष आयु. चंद्रकांत सुर्यवंशी साहेब व जिल्हा अध्यक्ष आयु.सातापा कांबळे बस्तवडेकर इत्यादी प्रमुख हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!