रंकाळा टॉवर परिसरातील प्रायोगिक तत्वावर १५ दिवसांच्या कालावधीकरिता वाहतुकीत बदल..

Share News

कोल्हापूर : वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहर वाहतूक शाखेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ०५ मार्च पासून २० मार्च २०२६ पर्यंत रंकाळा तलावानजीक असलेल्या रंकाळा टॉवर चौकास मिळणाऱ्या परिसरातील रस्ते ,फुलेवाडी नाका ते रंकाळा टॉवर ,खराडे महाविद्यालय ते जॉकी चौक बिल्डिंग , कृष्णा मेडिकल दुकान हायस्कुल ते रंकाळा टॉवर परिसरात प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक योजना व नो पार्कींग झोन लागू करण्यात आली आहे. या परिसरातील अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या मोटार वाहनांच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा ,रहदारीस अडथळा , वारंवार वाहतूक कोंडी या तक्रारी लक्षात घेऊन, वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी हे निर्णय घेण्यात आहे आहेत.

या नियोजनात –

एकेरी मार्ग :-

०१.रंकाळा टॉवर ते रंकाळा स्टॅन्ड हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांना जाणेकरीता एकेरी करण्यात येत आहे.

रंकाळा स्टॅन्ड कडून सरळ रंकाळा टॉवरकडे जाणेस सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

०२.रंकाळा स्टॅन्ड कडून तटाकडील तालीम चौक साकोली कॉर्नर मार्गे रंकाळा टॉवरकडे जाणेकरीता एकेरी मार्ग करण्यात येत आहे.

जॉकी बिल्डींग कडून साकोली कॉर्नर-तटाकडील तालीक चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.

रंकाळा टॉवर ते जॉकी बिल्डींगकडे जाणेस प्रवेश बंद करण्यात येत आहे. संबंधीत वाहन चालकांनी रंकाळा स्टॅन्ड मार्गे अगर पर्यायी मार्गाचा वापर करणेचा आहे.

०३.जावळाचा गणपती कडुन रंकाळा टॉवर चौकात येणारी सर्व प्रकारची वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.

सदर वाहन चालकांनी रंकाळा स्टॅन्ड कडून साकोली कॉर्नर मार्गे मार्गस्थ होणेचे आहे.

जॉकी बिल्डींग कडून रंकाळा टॉवरकडे जाण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे.

नो पार्कंग झोन :-

०१.तटाकडील तालीम चौकाचे चारही बाजूस ५० मिटर पर्यंत नो पाकींग झोन करण्यात येत आहे.

०२.जॉकी बिल्डींग परिसरातील तिनही मार्गावर ५० मिटर पर्यंत नो पार्कींग झोन करण्यात येत आहे.

हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे सूचना किंवा हरकती असल्यास १५ दिवसाच्या आत पोलिसांकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!