विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर

Share News

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला आणि युवकांसह समाजातील सर्व घटनांना सामावून घेणारा विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्प आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, शेती आणि सामाजिक योजनांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी विकासाचा समतोल राखत महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्याचा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याचा रोडमॅप असून यामुळे राज्याच्या प्रगतीला निश्चितच गती मिळेल आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल. राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प आहे. एकंदरीत पाहता राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला महाराष्ट्र राज्याकडून शाश्वत विकासाची हमी देणारा असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!