
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाबाबत तहसिलदार कार्यालय, कागल यांनी माहिती दिली असून, येत्या सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता तहसिलदार कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात ही सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार, कागल तालुक्यातील विगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी आरक्षण व महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
या सोडत कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक प्रतिनिधी, तसेच इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.