आमदार राजेश क्षीरसागर यांची शिष्टाई यशस्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर हिंदू जनसंघर्ष समितीचे उपोषण मागे

Share News

मुंबई दि.१८ : कोल्हापूर शहरातील सकल हिंदू समाज (हिंदू जनसंघर्ष समिती) यांच्यावतीने ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदू समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेले ९ ते १० दिवस आमरण सुरु आहे. या आमरण उपोषणामध्ये अनेक हिंदू बांधव – भगिनी सहभागी झाल्या आहेत. हिंदू समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी हे आमरण उपोषण करण्यात आले असून, या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. कोल्हापुरातील सुरु असलेल्या आमरण उपोषणाबाबत सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घडवून दिली. यावेळी उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीद्वारे थेट संपर्क साधून, “आपल्या मागण्या योग्य असून शासन त्यावर लवकरच निर्णय घेईल. आपण उपोषण थांबवावे” असे आवाहन केले. आमदार राजेश क्षीरसागर यांची शिष्टाई यशस्वी झाली असून, आज सकल हिंदू समाज व हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे सुरु असलेले उपोषणाची विजयी सांगता करण्यात आली.

यासह काल आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनामध्ये, मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढण्यात यावेत. परराज्यातून शिक्षणासाठी आळते, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे आलेल्या ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने त्यांच्या अल्पवयीन सहकारी विद्यार्थ्याचा शॉक देवून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावरून सदर मुलांची मानसिकता बिघडली असल्याचे दिसुन येत असून, अशी अल्पवयीन मुले समाजातील इतर घटकांसाठी त्रासदायक होत आहेत. त्यामुळे परराज्यातून मदरशांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलांना तात्काळ बंदी घालण्यात यावी. गोहत्याबंदी कायदा पारित केला असला तरीही तेच – तेच आरोपी पुन्हा पकडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्यावर कडक मोका अंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीने कडक कायदा अंमलात आणावा. बांगलादेशी रोहिंगे कोल्हापुरात वास्तव्यास असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. या बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ कोल्हापुरातून हाकलून काढावे. उत्तरप्रदेश राज्यामध्ये १५ दिवसातून एकदा संस्कार वर्ग आयोजित करणे बंधनकारक केले आहे. यासाठी कलम ३० अ रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठवावा. तसेच राज्यामध्ये १५ दिवसातून एकदा संस्कार वर्ग आयोजित करणे बंधनकारक करावे. लव्ह जिहादच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, यासाठी कायदा कडक करावा. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुस्लीम अल्पवयीन मुलांकडून हिंदू देव-देवता व थोर पुरुषांचा अवमान केला जातो. अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलाने वापरलेले सिम कार्ड ज्याच्या नावे असेल त्या व्यक्तीवर तसेच अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई करावी. समान नागरी कायदा दोन राज्यामध्ये लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही समान नागरी कायदा लागू करण्यात यावा. वक्फ बोर्ड रद्द करून, हिंदू बोर्डाची स्थापना करण्यात यावी. हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून देशविघातक कृत्यांना खतपाणी घालण्याचे काम सुरु आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे हलाल सर्टिफिकेट बंद झाले पाहिजे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. राज्यस्तरीय हिंदू सुरक्षा समितीचे गठन करण्यात यावे, अशा हिंदू जनसंघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

स्थानिक आमदार मा. राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत ही चर्चा आणि समन्वय यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासन स्तरावर चर्चा सुलभ झाली. यासह या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने राज्य शासनाशी सविस्तर सकारात्मक चर्चा केली. प्रामुख्याने “हिंदू सुरक्षा व कल्याण समिती” ही एक शासकीय समिती स्थापन करावी, अशी ठोस आणि दीर्घकालीन परिणामकारक मागणी शासनासमोर ठेवण्यात आली. यावर शासनाने सकारात्मक भूमिकेत राहून लवकरच ही समिती स्थापन करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले आहे. सह पालकमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या सर्व मागण्या सविस्तरपणे मांडल्या. उपोषणाचे गांभीर्य व हिंदू समाजाच्या भावना त्यांनी अधोरेखित केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मा. चंद्रकांतदादा पाटील यांना तात्काळ शिष्टमंडळाशी संपर्क करून चर्चा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक संवाद साधला व पुढील कार्यवाहीबाबत निश्चित आश्वासन दिले.

या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी गेलेल्या हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळामध्ये गजानन तोडकर, उदय भोसले, आनंदराव पवळ, अभिजित पाटील, विक्रमसिंह जरग, सौरभ निकम आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी होते. यासह उपोषणकर्ते संदीप सासने, सुनील सामंत, राजू तोरस्कर यांनी शासनाच्या विनंतीला मान देत व सकारात्मक चर्चेला प्राधान्य देत आजचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!