
कोल्हापूर : पोलीस विभागाच्या ‘मिशन झिरो ड्रग्स इन कोल्हापूर’ या उपक्रमाअंतर्गत गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील इंडोकाउंट व विलो कंपनीमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अमली पदार्थांचे दुष्परिणाम, कायदेशीर नियम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. परिसरात कोणी अमली पदार्थांची विक्री करत असल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.

सायबर कॉलेज, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून अमली पदार्थ सेवनाचे गंभीर परिणाम प्रभावीपणे सादर केले. या सादरीकरणाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला इंडोकाउंट व विलो कंपनीचे HR मॅनेजमेंट तसेच दोन्ही कंपनीतील ४०० ते ४५० कामगार उपस्थित होते.
या कार्यक्रमात पोलीस सहनिरीक्षक टी. जे. मगदूम मॅडम, इजाज शेख, संदीप गुरव, अप्पासाहेब घाटगे व नितेश कांबळे यांची उपस्थिती होती. सहनिरीक्षक मगदूम मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमामुळे औद्योगिक कामगारांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा प्रभावी संदेश पोहोचवण्यात यश मिळाले.