
कुपवाड : महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्र. 3 मध्ये अपुरा, अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठा तसेच समुद्रा स्ट्रीट लाइटिंग प्रायव्हेट लिमिटेड व महापालिकेच्या विद्युत विभागाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कुपवाड शहराच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकारी अभियंता अमरसिंग चव्हाण (विद्युत विभाग) आणि शाखा अभियंता अमरहमजा मुलाणी (पाणीपुरवठा विभाग) यांच्या लेखी उत्तरानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले.
या वेळी शहराध्यक्ष रवींद्र सदामते, युवा मोर्चा सरचिटणीस प्रकाश पाटील, ऋषिकेश (चेतन) सूर्यवंशी, नवनाथ खिलारे, अमीन शेख, मुकुंद चव्हाण, मानस विपट, बसप्पा कोरती, प्रकाश लवटे, भगवान रुपनर, सचिन खोत, माने काका, शंकर, सौ. गंगुताई नाईक, सौ. लतिका कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.