
हुपरी : तळदंगे गावच्या हद्दीतील ढेकळेमळा येथील ऊसाच्या शेतात दोन ते तीन महिन्यांचे अर्भक पुरलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी अज्ञात इसमाने नवजात अर्भकाचा जन्म झाल्याचे लपवून ठेवण्याच्या उद्देशाने ते अर्भक शेतात पुरून ठेवले. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी समीर आझम मुल्लाणी (वय ४२, पोलीस पाटील, रा. तळदंगे) यांनी हुपरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला असून पोलीस निरीक्षक निंगप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.