कोल्हापूरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी, इराणी खणीत विसर्जन, पोलिस व महापालिका सज्ज

Share News

कोल्हापूर : चैतन्यदायी आणि मंगलमय वातावरणात शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून लाडक्या गणरायाला वाजत-गाजत, भक्तिभावे निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांनी पारंपरिक वाद्ये, साऊंड सिस्टीम, आकर्षक रोषणाई, चित्ररथ आणि नृत्य पथकांसह जय्यत तयारी केली आहे. मुख्य मार्गासोबत दोन समांतर व एक पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून, सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीत होणार आहे. याकरिता महापालिकेची यंत्रणा पूर्ण सज्ज असून, सुमारे 3 हजार कर्मचारी तैनात आहेत. मिरवणुकीत लेसर लाईट, प्रेशर मिड व सीवोटू गॅसच्या वापरास बंदी घालण्यात आली असून, रात्री बारा वाजेपर्यंतच वाद्यांचा दणदणाट सुरू राहणार आहे. मिरवणूक मार्गावर पोलिस बंदोबस्त, ड्रोन कॅमेरे, बॅरिकेडस् तसेच वैद्यकीय पथके व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग राहणार आहे. पंचगंगा नदीत विसर्जन न करण्यासाठी मंडळांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!