
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी (२१ सप्टेंबर) संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था ANIने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या या भाषणाचा विषय अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, याआधी जेव्हा जेव्हा पंतप्रधानांनी अशाप्रकारे राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे, तेव्हा अनेक मोठे निर्णय जाहीर झाले आहेत.
सोशल मीडियावर या संबोधनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. २२ सप्टेंबरपासून देशभरात जीएसटी २.० चे नवे दर लागू होत असल्याने, पंतप्रधान मोदी या संदर्भात सविस्तर माहिती देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीपूर्वी सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता असल्यामुळे या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणात कोणती मोठी घोषणा होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.