
हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावातील अज्ञात चोरट्याकडून कुलूपबंद घरात घुसून चोरी केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी राहुल बबन संकपाळ रा. रुई इंगळी मेन रोड, इंगळी हे त्यांच्या नातेवाईकासोबत काही कार्यक्रमानिमित्त गावी गेले असता अज्ञात चोरट्याने भर दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्याचा बंद घराचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील साहित्याची झाडाझडती घेत सुमारे 1 लाख 30 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला त्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम समावेश होता. फिर्यादीच्या सांगण्यावरून हुपरी पोलीस ठाण्यात चोरीची घटनेची नोंद झाली असून पुढील अधिक तपास प्रभारी अधिकारी निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.