
कागल : महीलांचे आरोग्य तपासणी, जनजागृती व पोषण सेवांचा प्रसार करणेसाठी केंद्र शासन व राज्य शासन बांचे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ग्रामीण रुग्णालय, कागल व उमेद, तालूका अभियान व्यवस्थापन कक्ष कागल यांचेवतिने संयुक्तपणे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अतंर्गत आज वि. २०.०९.२०२५ रोजी महीला आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते वा शिबीरामध्ये विविध मोफत तपासण्या (कॅन्सर स्तन, गर्भाशय मूख, तोंड मधुमेह, प्रयोगशाळा तपासणी, क्ष किरण ईसीजी कुष्ठरोग क्षयरोग, दंत तपासणी, नेत्र तपासणी, हृदयरोग, अॅनिमिया, स्त्रीरोग तंज्ञ यांचे मार्फत विशेष तपासणी, गरोदर माता तपासणी व नियमित आरोग्य तपासणी अश्या व्यापक स्वरुपात वैद्यकिय तपासण्या न औषध उपचार करण्यात आले

मा.डॉ सरिता थोरात वैद्यकिय अधिक्षक कागल यांनी शिबीरासाठी उपस्थित महीलांना आरोग्याची काळजी अवयवदानाचे महत्व याबाबत माहीती दिली व निक्षयमित्र म्हणून स्वेच्छा नोंदणी बाबत आव्हान केले. या शिबीरासाठी स्वास्तिक हॉस्पिटल, कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटल यांनी सहभाग घेऊन त्यांचे मार्फत करण्यात येणा-या तपासण्या केल्या. रुग्णालयाकडील आरोग्यमित्रा मार्फत आभावार्ड, आयूष मान भारत कार्ड योजनेमध्ये लाभार्थीची नोंदणी करणेत आली. कागल शहर व ग्रामीण परिसरातील असे एकूण ३१९ महीलांनी या शिबीराचा लाभ घेतला उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
वा आरोग्य शिबीरासाठी ग्रामीण रुग्णालय, कागल कडील डॉ प्रियंका किल्लेदार, डॉ सुलभा पाटील, श्री दयानंद पाटील समन्वयक उमेद समन्वय, श्रीम भारती चौये अधिपरिचारीका, थीम सिमा शेवाळे, श्री विजय कोळी, श्री मुरेश पाटील, थी प्रकाश पोवार, श्री अरुण कांबळे, श्री गणेश गोधंळी इतर सर्व रुग्णालयातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होता या कार्यक्रमाने संयोजन प्रास्ताविक श्री राम सातवेकर सहा अधिक्षक यांनी केले व थी आर पी दांगट आरोग्य निरीक्षक आभार मानले