
कोल्हापूर : (गोकुळ) दूध संघाचे माजी ज्येष्ठ संचालक व तालुक्यातील ज्येष्ठ नेते रणजितदादा पाटील येत्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यामुळे कागल तालुक्यासह गोकुळच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. रणजितदादा पाटील यांनी जवळपास ४५ वर्षे गोकुळ दूध संघाचे संचालक, तसेच पं.स. व जि.प. सदस्य, गोकुळचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी बळकटी मिळणार असून जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा बाजार समिती व गोकुळच्या राजकारणात बदल घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या पार्श्वभूमीवर ‘टाईट फिल्डिंग’ सुरू केल्याची चर्चा असून डोंगळे-पाटील ही नवी जोडगोळी उभी राहिल्याने कोल्हापूरातील पाच ते सहा प्रभागात याचा परिणाम दिसून येईल, अशी लोकचर्चा आहे.