
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दिनांक २७ सप्टेंबर २०२५ श्री त्र्यंबोली देवीची ललित पंचमी यात्रा साजरी होणार असल्याने श्री. अंबाबाई देवीची पालखी टेंबलाई मंदिराकडे भेटीसाठी जात असते. सदर यात्रेस व कार्यक्रमास भाविकांची व नागरिकांची मोठया प्रमाणावर गदीं होत असते. या करीता वाहतुकीचे सोयीसाठी व नागरिकांचे व भाविकांचे सुरक्षितते करीता रहदारीच्या विनियमनासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी नियमन करणे आवश्यक असलेने मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी कोल्हापूर शहरात ललित पंचमी यात्रा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात खालील मार्ग सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना प्रवेश बंद करणे व अवजड मोटार वाहतूक वळविणे इ. पार्कींग व्यवस्था, अत्यावश्यक उपाययोजना करणेबाबतचे खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
खालील ठिकाणाहून सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने व पासधारक स्थानिक रहिवाशी खेरीज करून) टेंबलाई मंदिराकडे जाण्यास पुर्णवेळ प्रवेश बंदी करण्यात येत आहे
श्री त्र्यंबोली देवी मंदिराकडे टेलीफोन टॉवरकडून जाणारा मार्ग हा टेलीफोन टॉवर ते त्र्यंबोली देवी मंदीर गेट व पुढे आर्मी ऑफिसर्स क्यॉटर्सकडे जाणारा रस्ता ते विक्रमनगर व पाण्याची टाकीकडे जाणारा रस्ता कॉर्नर या बाजूनी सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
अवजड मोटार वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग:-
तावडे हॉटेल कडून येवून ताराराणी चौक व टेंबलाई उडडाणपुल मार्गे कागलकडे जाणारी सर्व जड, अवजड व हलकी मालवाहू वाहने ही ताराराणी चौकातून शिरोली जकात नाका, तावडे हॉटेल येथूनच सरनोबतवाडी मार्गे कागलकडे रवाना त्यांना टेंबलाई रेल्वे फाटक चौकाकडे येण्यास मनाई करण्यात येत आहे.
टेंबलाई रेल्वे उडडाण पुल (कोयास्को चौक) मार्गे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ये – जा करणाऱ्या एस टी व केएमटी बसेस यांनी तावडे हॉटेल मार्गे कागलकडे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे,
श्री. त्र्यंबोली देवी यात्रा विशेष के.एम.टी. बसेस टाकाळा सिग्नल चौक, टेंबलाई रेल्वे फाटक, टेलीफोन टॉवर येथे येतील व परत त्याच मार्गे मार्गस्थ होतील.
सकाळी ०६ ते १०.०० वाजेदरम्यान टाकाळा सिग्नल चौकाकडून श्री. अंबोली मंदिराकडे जाणारी सर्व अवजड मोटार वाहने टाकाळा चौकातून वि. स. खांडेकर मार्गावरुन राजारामपुरी रोडने सायबर कॉलेज, शिवाजी विद्यापीठ मार्गे पुढे मार्गस्थ होतील,
सकाळी ०६.०० वाजेपासुन उचगांव फाट्याकडुन टेंबलाई मंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गणेश मंदिर फाट्याजवळ प्रवेश बंद करण्यात येत असून त्यांनी उचगांव फाट्यावरुन सरनोबतवाडी मार्गे किंवा तावडे हॉटेलमार्गे सोवीनुसार मार्गस्थ व्हावे.
महामार्गावरून शाहू टोल नाका, छ. शिवाजी महाराज विद्यापीठ, हायवे कॅन्टीन चौक मार्गे कोयास्को चौक, ताराराणी चौकाकडे येणारे सर्व अवजड वाहनांना हायवे कॅन्टीन चौक याठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्या वाहनांनी सायबर चौक, इंदिरा सागर चौक मार्गे रिंग रोडने मार्गस्य व्हावे.
संभाजीनगर, इंदिरा सागर चौक, हॉकी स्टेडीयम शेंडा पार्क, सायबर चौक, हायवे केन्टीन मार्गे कोयास्को चौक, ताराराणी चौकाकडे येणारे सर्व जड अवजड वाहनांना हायवे कैन्टीन चौक याठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्या वाहनांनी सरनोबतवाडी नाका, राजाराम तलाव मार्गे महामार्गावर मार्गस्थ व्हावे.
पार्किंग व्यवस्था :-
कोयास्को चौक ते टेंबलाई मंदिर चौक जाणारे रस्त्या वरील दुभाजक ज्याठिकाणी संपतो त्या दरम्यानचे रस्त्याचे डावे बाजुच्या पुर्ण रोडवर टु व्हीलर पार्कींगची सोय केलेली आहे.
विक्रमनगर पाण्याचे टाकी जवळील परीसर याठिकाणी दुचाकी व चार चाकी वाहनांना पाकींग करीता सुविधा उपलब्ध केलेली आहे. वरील निर्देश दि. २६ सप्टेंबर२०२५ सकाळी ०६.०० वाजले पासून श्री. आंबोली देवीची यात्रा संपे पर्यंत सर्व प्रकारच्या मोटर वाहनांना प्रवेश बंद व अवजड मोटार वाहतूक (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) वळविण्यात व नियमन करण्यात येत आहेत,असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.