दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्याचा माझा ध्यास ; मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार

Share News

कागलमध्ये दिव्यांगाना उपकरणांचे मोफत वाटप

कागल : दिव्यांग नागरिकांच्या हालअपेष्टा बघितल्यानंतर मला अंतकरणापासून वेदना होतात. म्हणूनच दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्यासाठी सतत माझी धडपड असते. दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्याचा आनंद फार मोठा आहे, असे भावनिक प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल पंचायत समितीच्यावतीने सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्रालय दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाच्यावतीने एडीपी योजनेअंतर्गत ४७७ दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरण वाटप करण्यात आले.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सुदृढ लोकांना थोड्या जरी वेदना झाल्या आणि एखादा अवयव दूखू लागला तर चैन पडत नाही. मग, जन्मापासूनच अपंग व्यक्तींचे जीवन कसे हालाकीचे असेल याचा विचार करा. अशा लोकांना आधार देण्याची गरज आहे. परमेश्वराने अशा परिस्थितीत त्यांना पाठवले त्यांचे जीवन कसे सुकर होईल यासाठी माझा प्रयत्न आहे.

हे आपले सर्वांचेच कर्तव्य…..!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, दिव्यांगांच्या वेदना आणि हालअपेष्टा कमी होतील यासाठी काम करणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आणि जबाबदारी आहे. हे काय मी उपकार करत नाही, माझे कर्तव्य समजतो . दिव्यांग लोकांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करू. २००१ साली मतदारसंघात डोळे तपासणी शिबिर घेतले होते. त्यावेळी ८० हजार लोकांना चष्म्यांचे वाटप केले होते. मोतीबिंदू ऑपरेशनही करून आणली होती. आता तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी पूर्ण होत आहे. तसेच जिल्ह्यातील सतरा हजार मुलींना कॅन्सरवरील लस दिली आहे. उर्वरीत मुलींनाही लवकरच ही लस दिली जाणार आहे .

स्वागत व प्रास्ताविकात गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे म्हणाले,
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कागल तालुका आघाडीवर आहे . तालुक्यात दहा हजार घरकुल मंजूर झाले . पहिली ते बारावीच्या १७ हजार विद्यार्थ्यांची डोळे तपासणी झाली. तसेच; सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणारा कागल तालुका पहिला आहे. लवकरच दिव्यांग आयडी कार्ड देण्यासाठी कॅम्प आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

कागल: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिव्यांग बंधू-भगिनींना मोफत साहित्य व उपकरणांचे वाटप झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!