
कोल्हापूर : आज राष्ट्रीय लोक अदालत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने विविध वाहतूक नियमभंग प्रकरणांवर निकाल देण्यात आले. मद्यप्राशन करून वाहन चालविणे यावर एकूण 83 केसेस दाखल करण्यात आल्या असून त्यातून 1 लाख 78 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अवैध प्रवासी वाहतूक अंतर्गत 18 केसेस दाखल करून 36 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. इतर विविध उल्लंघनांबाबत 160 केसेस नोंदवून 1 लाख 36 हजार 700 रुपयांचा दंड वसूल झाला. एकूण 251 केसेसवर निकाल देत 3 लाख 50 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई ग्रेड पोलीस उपनिरीक्षक होवाळे, महापुरे, सहाय्यक फौजदार पाटील, पोलीस हवालदार जगताप, बेळमकर यांच्या पथकाने केली. ही माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.