
कागल : गणेशनगर नवीन घरकुल परिसरात उघड्यावर सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर कागल पोलिसांनी कारवाई करत एका बुकीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अशोक रामचंद्र काळुगडे (वय ४६, व्यवसाय शेती, रा. गणेशनगर नवीन घरकुल, ता. कागल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मांजरा बिल्डिंगच्या बोळात आरोपी उघड्यावर जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान आरोपीकडून ८ हजार रुपये रोख रक्कम, एक मोबाईल हँडसेट व सिमकार्ड जप्त करण्यात आले.
आरोपी हा स्वतः बुकी मालक असून लोकांकडून जुगाराचे अंक घेऊन चिठ्ठ्यांवर लिहून पैसे स्वीकारत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पुढील तपास प्रभारी अधिकारी गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस करत आहेत.