महापालिकेवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी एकजुटीने काम करा – मंत्री मुश्रीफ

Share News

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. रंकभैरव मंदिर दीपमाळा जीर्णोद्धार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि माजी महापौर हसीना फरास यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात महायुतीची सत्ता असून या सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. पुढील चार वर्षेही हीच सत्ता कायम राहणार असून विकासासाठी निधी आणण्याची क्षमता महायुतीकडेच आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेवरही महायुतीची सत्ता आवश्यक आहे. सर्किट बेंच, तीर्थक्षेत्र विकासासह विविध प्रकल्पांमुळे कोल्हापूर शहर जागतिक नकाशावर येत असून हे काम अधिक गतीने पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!