शिवसेनेचा “मिशन महानगरपालिका” इच्छुक उमेदवार, शुक्रवारी पदाधिकारी मेळावा : आमदार राजेश क्षीरसागर

Share News

कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा आणि शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना व शिवसैनिकांचा “मिशन महानगरपालिका” मेळावा उद्या शुक्रवार दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता अभिषेक लॉन, ब्रम्हपुरी, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे पार पडणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकविण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षही निवडणुकीत संपूर्ण ताकतीने उतरत आहे. शिवसेनेकडे शहरातील विविध प्रभागात इच्छुक आणि सक्षम उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने नियोजन आणि जनसंपर्क वाढवून मतदारांपर्यंत शिवसेनेची भूमिका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे योजनारुपी कार्य, विकासात्मक कार्य पोहचविण्यासाठी सक्षम प्रचार यंत्रणा आदी बाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी उद्या शुक्रवार दि.१९ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!