
कागल : कागल शहरातील अखिलेश पार्क परिसरात घरात घुसून एका महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला या घरात काम करत असताना दुचाकीवरून तिघेजण तेथे आले. यावेळी अख्तर समीर जमादार याने फिर्यादीचा हात पकडून जवळ ओढत विनयभंग केला. तसेच फिर्यादी व त्यांच्या पतीस शिवीगाळ करून मारहाण करत जखमी केले. गणेश मच्छिंद्र कांबळे (रा. निपाणी वेस, ता. कागल) याने हातात चाकूसारखे धारदार हत्यार घेऊन धमकी दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करीत आहेत.