
कोल्हापूर : नवरात्रोत्सवामध्ये श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणान्या लाखो भाविकांना वाहन पार्किंगच्या समस्येमुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील पहिला ‘स्मार्ट पाकिंग मॅनेजमेंट सिस्टीम’ (Smart Parking Management System) हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर शहरात सुरू करण्यात येत आहे.
या अभिनव प्रणालीमुळे भाविकांना पाकिंगची जागा शोधणे, वाहन सुरक्षितपणे पार्क करणे आणि परत येताना गाडी घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
प्रणाली कशी काम करेल?

QR कोड आणि ऑनलाइन माहितीः शहरातील ठिकठिकाणी पार्किंगच्या जागेचे QR कोड लावण्यात येतील हा (QR कोड स्कॅन करुन भाविक शहरात नियुक्त केलेल पार्किंगचे ठिकाण शोधू शकतील.
तसेच भाविक https://parking.mahabooking.com या वेबसाइटवर जाऊन पार्किंगची माहिती मिळवू शकतील,
पाकिंग स्थळांची उपलब्धता : या वेवसाइटच्या होम पेजवर पार्किंगच्या जागेची यादी, गुगल मंपची लिंक, उपलब्ध जागा (Availability) आणि वाहनांचा प्रकार (Vehicle Type) याची माहिती उपलब्ध असेल. यामुळे भाविकांना त्यांच्या जवळची सोयीस्कर पार्किंगची जागा सहज शोधता येईल.
वाहन प्रवेश (Check-in): पार्किंगच्या ठिकाणी पोहोचल्यावर स्वयंसेवक (Volunteer) वाहनांच्या नोंदी करतील. वामध्ये वाहन मालकाचे नाव, मोबाईल नंबर (WhatsApp), आणि बाहनाचा फोटो घेतला जाईल. हो माहिती भरल्यानंतर लगेचच वाहन मालकाला त्याच्या WhatsApp नंबरवर एक पार्किंग पास (Parking Pass) मिळेल, या पारामध्ये पाकिंगमध्ये प्रवेशाची वेळ (In-Time), सर्व नोंद केलेली माहिती आणि एक बुनिक QR कोड असेल.
रिअल-टाइम अपडेटः प्रत्येक वाहन पार्किंगमध्ये आत आल्यावर किंवा बाहेर गेल्यावर पार्किंगमधील उपलब्ध जागांची संख्या आपोआप (Automatically) अपडेट होईल, यामुळे पाकिंगची अचूक स्थिती कळेल.
वाहन बाहेर काढणे (Check-out): वाहन बाहेर काढताना स्वयंसेवक पार्किंग पासवरील QR कोड स्कैन करतील, त्यानंतर वाहन मालकाला त्याच्या WhatsApp वर पाकिंग चार्जची स्लिप (Parking Charge Slip) मिळेल.
सुरक्षा आणि सुलभ व्यवस्थापनः या स्मार्ट प्रणालीमुळे प्रशासनाला चहनांचा मागोवा घेणे आणि पार्किंग व्यवस्था सुरळीत चालवणे सोपे जाईल. यामुळे भाविकांना त्रास होणार नाही आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल,